Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

वैभव म्हणजे असते नारी Gazalkara Sarita Gokhale

• गझल प्रभात •   


 🌹महिला दिन विशेष 🌹

🌹वैभव म्हणजे असते नारी🌹


अस्तित्वाचे वैभव म्हणजे असते नारी

संसाराचे वैभव म्हणजे असते नारी


या विश्वाला वटवृक्षासम छाया देते

वात्सल्याचे वैभव म्हणजे असते नारी


सदा यशाचे बीज रोवते निर्धाराने

सौहार्दाचे वैभव म्हणजे असते नारी


चुका विसरते क्षणात सा-या झाल्या गेल्या 

स्वानंदाचे वैभव म्हणजे असते नारी


जन्मभरी त्या संस्काराचे जपते नाते

समर्पणाचे वैभव म्हणजे असते नारी


लहानमोठ्या सेवेसाठी तत्पर असते

कर्तव्याचे वैभव म्हणजे असते नारी


असे वाटते तिच्याविना हा जन्मच अपुरा

आधाराचे वैभव म्हणजे असते नारी


पत्नी मुलगी सखीप्रमाणे जपते सा-या

मातृत्वाचे वैभव म्हणजे असते नारी 


सौंदर्याचे सौभाग्याचे माधुर्याचे

पावित्र्याचे वैभव म्हणजे असते नारी


स्मिता

सरिता प्रशांत गोखले


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments