• गझल प्रभात •
🌹महिला दिन विशेष 🌹
🌹रिती सुखाची करेन घागर🌹
मनास व्यापक करायचे तर
आकाशाची पांघर चादर
किती निरागस असतो आपण
परिस्थितीने होतो निब्बर
आईचेही कष्ट समजले
खेळत बसले जेव्हा घर घर
गोड नदीची व्यथा निराळी
खारट झाली.. मिळता सागर
दुःखाला गोंजारत बसले
म्हणुन सुखाचा नव्हता वावर
दुनिया इतके शिकवत असते
नकोच शाळा नकोच दप्तर
मैत्री, नाते असते वरवर
फसू नका हो ! या भानावर
दुःख असावे इतके सुंदर
रिती सुखाची करेन घागर
सुप्रिया पुरोहित हळबे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments