• गझल प्रभात •
🌹महिला दिन विशेष 🌹
🌹दुवा 🌹
जोडेन रोज माझ्या वाटा तुझ्या घराशी
लांबून ओळखीचे बोलू किती तुझ्याशी
पायातले दिसेना.. अंधार जाणवेना
जुळवून घेत आहे माझे शहर धुक्याशी
होतात एक दोघे पण फक्त धूळ उडते
माती भिऊन करते शृंगार वादळाशी
चढले शिखर धिराने.. टोकास तोल गेला
झाले अपंग... पडले निपचीत पायथ्याशी
ज्याच्यात रंग भरते.. तो रंगवून जातो
फसले.. म्हणून सांगा भांडू कुणाकुणाशी
लांघून उंबरा ते माझ्या कुशीत शिरते
बोलून रोज बघते दारातल्या उन्हाशी
घोटून श्वास माझे..भवताल बंद झाले
मृत्यो तुझी 'दिशा' मी साधू दुवा कुणाशी
... दिशा
डॉ. स्नेहल कुलकर्णी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments