Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दगडात जीव रमतो Gazalkar Shivaji Salunke

• गझल प्रभात •   



🌹वाढदिवस विशेष 🌹

 🌹दगडात जीव रमतो🌹


संतुष्ट माणसाचा, नरकात जीव रमतो

निष्ठूर दांभिकाचा, गर्वात जीव रमतो 


सन्मित्र-नातलगही, नसतात जवळ तेव्हा

चित्तास तृप्त करण्या, ग्रंथात जीव रमतो 


राहून दक्ष देतो, सीमेवरी पहारा

युद्धात सैनिकाचा, बर्फात जीव रमतो


पुत्रासही विसरला, धुंदीत संत गोरा

भक्तीत विठ्ठलाच्या, चिखलात जीव रमतो 


भर पावसात श्रमतो, राजा बळी कशाला?

अंकूरता बियाणे, स्वप्नात जीव रमतो


उपभोग शक्य आहे, स्वर्गातल्या सुखाचा

अलवार पंकजाचा, भ्रमरात जीव रमतो


पृथ्वीत खोलवर अन्, सागरतळास जाती

शास्त्रज्ञ बांधवांचा, विवरात जीव रमतो


नसते प्रिया जवळ पण, आभास सौख्य देती

क्षणभर डिपीत बघता, तिमिरात जीव रमतो


चुकला कुणी 'किरण' तर, सन्मार्ग दाव त्याला

माणूस घडवताना, दगडात जीव रमतो


शिवाजी साळुंके, 'किरण' 

चाळीसगाव, जि. जळगाव.

मो. 8788471292


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments