• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹शिवले होते🌹
पुण्याने शिवले ना मग, पापाने शिवले होते.
आजन्म मला जगण्याच्या, व्यापाने शिवले होते.
कुठलीच समीक्षा नव्हती, टाकाही उसवू शकली.
माझे कवितेचे कपडे....बापाने शिवले होते.
तू सोडुन या ओठांवर, कोणीच फिरकले नाही.
मी ओठ तुझ्या नावाच्या, जापाने शिवले होते.
हे घाव टाचले तेव्हा..मी शुद्धीवरती नव्हते..
माहित नाही 'ताई' की, 'आपाने' शिवले होते.
उसनी मापे घेउन मी...मापारी झालो नाही..
जे शिवले मी ते माझ्या..मापाने शिवले होते.
गोपाल मापारी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments