• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹मला चंद्र माझा कधीचा मिळाला🌹
नजर लागली या, खुळ्या काळजाला
उगच पाहिले मी, तिच्या काजळाला
मुले बायको अन्, सगे सर्व सुटले
सुटेना कसा पण तुझा एक प्याला?
उजेडास त्याची न किंमत कळाली
जरी जीव जाळुन दिवा शांत झाला
भरवसा नको तेवढा ठेवला मी
नका नाव ठेवू , उगी वादळाला
गुन्हे सर्व घेतो, तिचे मी स्वतःवर
हवी ती सजा द्या मला एकट्याला
मला चांदण्यांचे, न कौतुक आता
मला चंद्र माझा कधीचा मिळाला
महेश होनमाने
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments