• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹🌹वाट चालल्यावर 🌹🌹
दोघे मिळून सोबत ही वाट चालल्यावर
झाला प्रवास अमुचा इतका सहज नि सुंदर
जादू तुझ्या प्रितीची आहे टिकून अजुनी
झाले कधी कमी ना दोघांमधील अंतर
डोहात काळजाच्या उतरून एकदा बघ
दिसतो जसाच वरवर नाही तसा खरोखर
आश्वासनामुळे या भरणार पोट नाही
हातास काम दे तू शिजण्या घरात भाकर
शब्दामधून झरतो इतका मिठास हल्ली
गजलेत सोडले मी ओठामधील साखर
मारोती आरेवार
मो. 9403239435
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments