• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹पुढल्या जन्मी 🌹
फुलासारखी दिसेन म्हणते पुढल्या जन्मी
देवाचरणी हसेन म्हणते पुढल्या जन्मी
इथे हरवले अस्तित्वाचे जे नभ माझे
श्वासांमध्ये भरेन म्हणते पुढल्या जन्मी
रुसव्या फुगव्या मध्ये सरले आयुष्य जणू
बंधनात ना पडेन म्हणते पुढल्या जन्मी
स्वप्ने काही विरून गेली प्रवाहामधे
पूर्ण तयांना करेन म्हणते पुढल्या जन्मी
हिरावले जे प्रेम आपुले या जन्माने
माझ्यापाशी जपेन म्हणते पुढल्या जन्मी
झिजत राहिले, साऱ्यांसाठी, चंदन बनुनी
स्वतःसाठीच जगेन म्हणते पुढल्या जन्मी
दिल्या यातना हया जन्माने मला सुजाता
सौख्यामध्ये खुलेन म्हणते पुढल्या जन्मी
डॉ. सुजाता मराठे
मुंबई
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments