• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹माणुसकीचे नाते 🌹
माणुसकीचे नाते कायम जपून जावे
जीवन सारे चंदन होवुन झिजून जावे
कसा पसरला अंधार बघा जिंदगीवरी
उजेड देण्या वातीसमान जळून जावे
बिनधास्तपणे या दुःखानो स्वागत आहे
मी तर म्हणतो दुःखा सोबत लढून जावे
प्रेमामध्ये जातीच्या बघ किती अडचणी
प्रेमापोटी भरकटून ना खचून जावे
अंहपणाचे उगाच ओझे नको माणवा
बहर फुलांचा ऋतू संपता गळून जावे
क्षणा क्षणाने जरा जरासे जीवन सरते
संधी मिळता मी राजासम नटून जावे
जीवन गाणे आनंदाने गात राहवे
जीवन सारे सप्त सुरांनी भरून जावे
बा. ह. मगदूम
(मध्य रेल्वे पुणे, कार्यरत)
मो. ९८२२५१८०९९
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments