• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹अडत नाही कुणाचेही🌹
अडत नाही कुणाचेही कुणावाचुन कळत आहे
हवा होतास यावेळी असेही मन म्हणत आहे
मनाच्या कोपर्यामध्ये स्मृतीचे पान जे आहे
मला जेंव्हा हवी सोबत अताही ते करत आहे
गुपित माझे तुझे होते जवळच्यांनाच ठाउक तर
उघड झाले कसेआता चव्हाट्यावर फिरत आहे
तुझी गाडी निघाल्यावर तिथे मी पोचले होते
रुळावर त्याच माझे मन अताही फरफटत आहे
नवे काही घडत नाही खरोखर खंत आहे पण
जुने काही नवे म्हणुनी इथे आता खपत आहे
रेखा येळंबकर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments