Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

विसाव्याला कशी येऊ Gazalkara Uma Patil

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹विसाव्याला कशी येऊ🌹


विसाव्याला कशी येऊ तुझ्यापाशी अता मी

ऋतूंची होत असतांना बघितली सांगता मी


अता तर फक्त आठवणीच उरल्या त्या क्षणांच्या

तुला समजायचे जेव्हा न काही बोलता मी


तुला भेटायचे असते... तरी राहून जाते

अता पाऊस येऊ दे तुला बोलावता मी


युगांपासूनचा दुनियेत गोंधळ माजलेला 

तरीही भंग ना केली मनाची शांतता मी


तुझ्यापासून आहे याचसाठी दूर आले

जवळ यावास माझ्या तू जरा रागावता मी


उमा पाटील

मो. 9422750558


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments