• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹आयुष्याची विहीर🌹
अंतरातला ईश्वर जपणे इतके सोपे नसते...
चिखलामधुनी नितळ वाहणे इतके सोपे नसते...
घाव घालती चहूदिशांनी प्रलोभनांचे भाले...
चारित्र्याची ढाल पकडणे इतके सोपे नसते...
सोपे असते नटणे थटणे फुलासारखे दिसणे...
कर्तृत्वाचा सुगंध भरणे इतके सोपे नसते...
आधी गिळणे कसेबसे अन् रवंथ नंतर करणे...
अपमानाचे शब्द पचवणे इतके सोपे नसते...
गाठीवरती गाठ मारणे, सहजा सहजी जमते...
पण बसलेली, गाठ उकलणे इतके सोपे नसते...
वळणावरती भल्याभल्यांची कशी बोबडी वळते...
जसे बोलतो तसे चालणे इतके सोपे नसते...
तहानलेले येणे आणिक तहानलेले जाणे...
आयुष्याची विहीर खणणे इतके सोपे नसते...
अरुण सुनगार ( सूर्य )
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments