Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

चर्चा झाली Dr Swati Bhadre Akuskar

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹चर्चा झाली🌹


खूप गाजली जी दोघावर चर्चा झाली

जरा भेटलो अन् पारावर चर्चा झाली


तू आल्याची खबर पसरली गावामध्ये

पुन्हा एकदा बघ माझ्यावर चर्चा झाली


जाताना तो फक्त म्हणाला 'येतो आता'

या ही वेळी कुठे कशावर चर्चा झाली


घंटा नक्की गळ्यात त्याच्या बांधू आपण

अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली


किती मनाने अस्थिरतेचा कळस गाठला

व्यर्थच गेली जी पाऱ्यावर चर्चा झाली


छान उमलले सावलीतही या झाडीच्या

बागेमध्ये रानफुलावर चर्चा झाली


जगास दिसल्या आयुष्याच्या फक्त उणीवा 

तुझ्या गुणांवर तू गेल्यावर चर्चा झाली 


डॉ. स्वाती भद्रे आकुसकर

नांदेड

मो. 9975468023


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments