• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹अता मीच करते करमणूक माझी🌹
खरे सांग नव्हतीच जर चूक माझी
कशी काय झाली फसवणूक माझी.!
अता शक्य नाही मने सांधणेही
तरी शक्यता एक अंधूक माझी.!
तहानेस त्याच्या सदा तृप्त केले
कधीही न सांगितली भूक माझी.!
पुन्हा हातचा एक जाताच आली
पुन्हा एक बेरीज बिनचूक माझी.!
तुझ्याएव्हढा हक्क कोणास होता
तरी तूच केली छळवणूक माझी.!
जरी खोलवर घाव झाला तरीही
खरी ओळ असणार नाजूक माझी.!
अता मीच माझ्यात रममाण होते
अता मीच करते करमणूक माझी.!
ममता सिंधुताई सपकाळ
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments