Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

श्वासही उसने मिळाले आपल्याला Gazalkar Laxman Ugale

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



🌹श्वासही उसने मिळाले आपल्याला🌹


वागणे उर्मटपणे.... इतके कशाला

श्वासही उसने मिळाले आपल्याला


चेहरा घाणेरडा दिसता स्वतः चा

दोष देऊ लागला तो आरशाला


मिसळतो रंगात मी जर कोणत्याही

रंग माझा वेगळा सांगू कशाला


दार ठोठावून बघ माझ्या मनाचे

तूच ओ देशील मग आतुन स्वतःला


आर्त टाहो फोडला जेव्हा मुलीने

मग कुठे आली खरी शोभा मढ्याला


लक्ष्मण उगले


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments