• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹भय मृत्यूचे🌹
भय मृत्यूचे घेवुन आले सोसाट्याचे वादळ दारी
पाला पाचोळ्यासह नेली आयुष्याची स्वप्ने सारी
देवांनीही केली होती प्रेमनगरची वेडी वारी
बानू साठी उतरुन आला जेजूरी गड जय मल्हारी
भाग्यवान मी मला मिळाला सप्तपदीने साथी भारी
चिडतो रुसतो तरिही टिपतो जगण्यामधले क्षण जरतारी
विकून गेला जो तो माती बनून विक्रेता व्यवहारी
ग्राहक नव्हता कुणी मुक्याच्या सोन्यालाही भर बाजारी
घर अंगण अन् बाग मिळाली तशीच सारी सौख्ये न्यारी
कसे फुलावे मुग्ध कळीने नाही जर का तो शेजारी
डॉ. विजया नवले (झरकर)
पुणे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments