• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹व्यथा सांगून गेल्या 🌹
शल्य संसारातले बोचून गेल्या
बांगड्या टिचल्या, व्यथा सांगून गेल्या
एकही चिटपाखरू नाही फिरकले
पारध्याच्या सावल्या थांबून गेल्या
मी कशी देऊ तुला हृदयात जागा
प्रेम, ममता भावना आटून गेल्या
ठेवल्या लपवून त्यांनी पण समजल्या
बातम्या गोटातल्या छापून गेल्या
चेहरा पाहून कळले वय सख्यांना
वाटते तीशीतली बोलून गेल्या
कर उजागर विश्व सारे बघ निमाले
सावल्या काळया इथे राहून गेल्या
नेसली साडी उभे माहेर स्मरले
दाटल्या माया टिपे गाळून गेल्या
रुपाली पाटील
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments