Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नदी बाईच असते Gazalkara Nilofar Shaikh Faniband

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹नदी बाईच असते 🌹


बुडुन जावे तुझ्या प्रेमात हेही वाटले होते 

तुझ्यामधले जलाशय केवढे पण कोरडे होते 


वचन, शपथा रडत होत्या मला बिलगून त्या रात्री 

तुझा फोटो मनातच एकदा मी जाळले होते


भुकेची तीव्रता कळणार का सांगून कोणाला

मुलीने चित्रसुद्धा भाकरीचे काढले होते


तिला वाट्टेल तेथे अन् तसे ती वाहिली असती

नदीने पण तरी बंधन जगाचे पाळले होते


निरक्षर एक मुलगी वाटली होती अडाणी पण

मुलीने जिंदगीचे यार पुस्तक वाचले होते


कुणाच्या वाटण्याने मी तशी होणार आहे का?

मनाच्या आत मीही लावलेले आरसे होते


मला इतके कळाले बस नदीला पाहिल्यावरती

नदी बाईच असते जन्मभर बस 'वाहणे' होते




निलोफर शेख-फणीबंद


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments