Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

निघू Gazalkar S G Gulve

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹


🌹 निघू 🌹


पोचायची आहे मला घाई ...निघू

ती अन्यथा भेटायची नाही....निघू


गप्पा तरी मारू किती मी एकटा 

बोलायचे नसले तुला काही ....निघू


आई  उपाशी एकटी आहे घरी 

माझ्याविना जेवायची नाही ...निघू


  तुमच्यासवे भटकायला नाही सवड

चिंता मला जालीम पोटाची ....निघू


थांबून काही फायदा नाही अता

काही गरज नाही तुला माझी ...निघू ?


नाही म्हणत असतो तिला प्रत्येकदा

प्रत्येकदा ती हेच म्हणते की ......निघू


आपण कितीदा टाळली होती तरी

आलीच शेवट वेळ जाण्याची.....निघू


             एस. जी. गुळवे

 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments