Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शब्दांचे हार केले Gazalkar Sunil Bawane

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



  🌹 शब्दांचे हार केले 🌹


वेदनांशी भांडलो अन् दुःख अवघे पार झाले

आत येणाऱ्या सुखांना मोकळे मग द्वार झाले


ध्येय पुर्तीच्या दिशेने टाकले पाऊल जेव्हा

तप्त माझे हुंदके ही जाणिवेने गार झाले


लायकी काढून हसले सोबतीचे मित्र तेव्हा 

स्वप्न मोठे पाहण्याचे भूत मजवर स्वार झाले


मांडले प्रस्ताव जेव्हा मी स्वतःच्या जीवनाचे

त्याच वेळी शत्रु माझे बिलगुनी मज, यार झाले


कोंडमारा भावनांचा शांत करण्याला कितीदा 

काढण्या समजूत माझी शब्दची आधार झाले


चाहते असतात अपुले सर्वकाही  बोललो अन् 

चाहत्यांच्या स्वागताला शब्द माझे हार झाले

          

सुनिल बावणे - निल

 बल्लारपूर, चंद्रपूर


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments