Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

माणूस घडविणारे कोठे दुकान नाही Gazalkara Anisa Sikandar

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹




 माणूस घडविणारे कोठे दुकान नाही


स्वर्गात काय आहे कोणास ज्ञान नाही

कर्मा शिवाय तेथे मिळणार स्थान नाही


आहेत खूप नाते मायेत घोळणारी

आई शिवाय दुसरे कोणी महान नाही

 

संस्कार रुजविणारे वृद्धाश्रमात गेले

माणूस घडविणारे कोठे दुकान नाही


पुजले जरी सुखाला अगदीच पाचवीला

नशिबात काय लिहिले कोणास जाण नाही


सर्वच सुखे मिळाली ज्यांना मनाप्रमाणे

त्यांच्या शिवाय कोणी मग भाग्यवान नाही


जगणे किती नकोसे झाले जरी कुणाला

आयुष्य संपवावे हे खूळ छान नाही


छोट्याच कारणाने घटनेत बदल व्हावा

इतके फुटकळ अपुले तर संविधान नाही


अनिसा सिकंदर

दौंड, पुणे

मो. 9270055666


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments