• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
श्वास घेण्याची सवय झाली मला
पाठलागाची सवय झाली मला
भक्ष्य होण्याची सवय झाली मला
चोर सोडी आणि संन्यासी धरी
ह्याच न्यायाची सवय झाली मला
सोसतो आहे असे दुर्लक्ष मी...
लक्ष्य होण्याची सवय झाली मला
लावला मी जोर जगण्याचा असा
श्वास घेण्याची सवय झाली मला
मी पुन्हा आलोच या दारी कसा ..?
येत जाण्याची सवय झाली मला
कापले कोणी तरी आहे उभा
एवढी त्याची सवय झाली मला
सोबती नाही तिचा मी आजचा
सात जन्माची सवय झाली मला
कोण प्रेमाने असे बोलावतो...?
... भास होण्याची सवय झाली मला
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी
लातूर
जेष्ठ गझलकार प्रा. डॉ. संतोषजी कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments