Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सांजवेळी दिवा अंगणी लागतो Gazalkar Rushabh Kulkarni

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



🪔सांजवेळी दिवा अंगणी लागतो🪔


जीवना तू मला का असा टाळतो ?

सांग देणे तुझे कोणते लागतो ?


सहज पुसली तुझी आसवे एकदा..

दुःख सारे तुझे का मला सांगतो ?


लाख दुःखे उरी घेउनी चाललो

वेदने मी तुझा सोयरा लागतो !


हात हातात दे सोबती साथ दे

स्वर्ग साती तुझ्या ओंजळी टाकतो..


ओळखीचे किती चेहरे भोवती

कोण परका, कुणी आपला वाटतो..


स्वार्थ साधून बघ बदलली माणसे

जगरहाटी जशी मी तसा वागतो..


आत्मरक्षण तुझे तूच कर द्रौपदी..

कृष्ण हाकेस आता कुठे धावतो..


कष्ट केल्याविना फळ कुठे भेटते? 

अपयशाने उगा आसवे गाळतो?


झळ उन्हाची कधी श्रावणाच्या सरी

कायदे मी ऋतूंचे इथे पाळतो..


सौख्य चालून येते कसे हे घरी..

सांजवेळी दिवा अंगणी लागतो..


ऋषभ कुलकर्णी 

छत्रपती संभाजीनगर


गझलकार ऋषभजी कुलकर्णी  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments