• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹पुन्हा फुलण्यास विनवत राहिलो🌹
नित्य इतरांच्या चुका बिनधास्त काढत राहिलो
'मी कधी नाही चुकत', हे सत्य मानत राहिलो
सर्व आठवणी तिच्या मुद्दाम टाळत राहिलो
पण तरीही मी तिला स्वप्नात पाहत राहिलो
क्षणभरासाठी तिला बघणे मला ही पर्वणी
त्याचसाठी खूप वेळा वाट चुकवत राहिलो
फक्त ऐकावे अशी त्याची अपेक्षा मोजकी
मात्र मी पर्याय त्याला खूप सुचवत राहिलो
लोक गाभाऱ्यात काही लाच देउन पोचले
ईश्वराला मी उभ्या रांगेत भेटत राहिलो
पाहण्यासाठी फुले ती वेळ काढुन यायची
त्यामुळे त्यांना पुन्हा फुलण्यास विनवत राहिलो
वाट बघताना तिची अस्वस्थ झालो फार मी
ती न येण्याचे तरी संकेत खोडत राहिलो
गणेश भुते
गझलकार गणेशजी भुते यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments