• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹जीव जडला कागदावर🌹
कैक ओळी खोडल्यावर
जीव जडला कागदावर
दडवले सूर्यास कोणी
आळ आला कवडशावर
चंद्र ही नसणार शीतल
प्रेम केले चांदण्यावर
फक्त मी माणूस झालो
जात आली दाखल्यावर
मर्म जगण्याचे कळाले
पावले ठेचाळल्यावर
आतड्यांना पीळ पडला
पोट भरले खरकट्यावर
भांडणे लावून झाली
भाजली पोळी तव्यावर
रत्नाकर जोशी
जिंतूर
गझलकार रत्नाकरजी जोशी यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments