• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹जीवन 🌹
सैल केले बंधनांना
मुक्त केले भावनांना
या मनाच्या अंतरंगी
बंद केले वेदनांना
गोड भाषा वापरूनी
जोडले मी माणसांना
शर्करेचे शब्द ओठी
पाहिले मी बोलतांना
पेरती शब्दांत साखर
स्वार्थ त्यांचा साधतांना
पाहिले मी लोक काही
स्वार्थ त्यांचा त्यागतांना
ढाल जिद्दीची धरूनी
जीवनाशी झुंजताना
विकास मधुसूदन भावे
गझलकार विकासजी मधुसूदन भावे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments