• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹आठवण आता नको 🌹
कालच्या त्या पावसाची आठवण आता नको
चिंब भिजल्या काळजाची आठवण आता नको
आपलासा वाटतो हा सूर्य अन त्याच्या झळा
पोळणाऱ्या चांदण्याची आठवण आता नको
या ठरावाला सशांनी मंजुरी आहे दिली
जिंकलेल्या कासवाची आठवण आता नको
काल होत्या तू दिलेल्या त्याच जखमा दे पुन्हा
पण तुझ्या त्या हासण्याची आठवण आता नको
मी प्रवासी... कालयात्री... चाललो आहे पुढे
काल सरलेल्या क्षणाची आठवण आता नको
संजय कुळये
गझलकार संजयजी कुळये यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments