• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹मित्रा 🌹
फार फार तर शंभर वर्षे हाती मित्रा
क्षणाक्षणाला बदलत जाती नाती मित्रा
रडणे कुढणे पडणे उठणे अन सावरणे
हेच शिकवती ही गवताची पाती मित्रा
कधीच नाही पक्षी चिंता करत उद्याची
दिवस आजचा करत साजरा गाती मित्रा
काही केल्या समाज अपुला बदलत नाही
आड कुठेही येतच जाती, जाती मित्रा
तुझ्यासारखा दोस्त मिळाला संकटकाळी
झाली नाही आयुष्याची माती मित्रा
मुले निघाली सद्गुणी किती भाग्यवान मी
भरून आली अभिमानाने छाती मित्रा
दिवस वाटतो घमघमणारा हिरवा चाफा
निशिगंधासम धुंद सुगंधी राती मित्रा
उर्मिला बांदिवडेकर
गझलकारा उर्मिलामाई बांदिवडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments