• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹ऋतू प्रेमाचा करूया साजरा🌹
ऋतू हा आज प्रेमाचा करूया साजरा तेथे
कशाला पाहिजे आता व्यथांना आसरा तेथे
सखीच्या आज प्रेमावर लिहाया घेतला मुखडा
अचानक त्यात का यावा विसंगत अंतरा तेथे
शवाने श्वास घेताना यमाने पाहिले तेंव्हा
यमाचा जीव का व्हावा असा मग घाबरा तेथे
उजळल्यावर जगाला तू तुझ्या तेजामधे सूर्या
वळव दृष्टी तुझी अमुचा तमाचा उंबरा तेथे
युगाचे प्रेम होते जर दिव्यावरती पतंगाचे
स्वतः का जाळुनी घेतो दिव्याच्या पाखरा तेथे
सुभाष मोहनदास
ठाणे
मो. ९९२०३९५८१५
गझलकार सुभाषजी मोहनदास यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments