Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नितळ झरे आपण Gazalkara Seema Zunjarrao

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



🌹नितळ झरे आपण 🌹


सुधाराया दिली त्यांना उगी किंमत खरे आपण

पुन्हा का वाटते आहे तसे होतो बरे आपण


जवळ काहीच नसतांना गरज ना भासली कसली

किती होतो समाधानी सुखाचे उंबरे आपण 


कळेना होत का गेली मनाची रोजची पडझड   

निघालो काळजाला पण पुढे पाडत चरे आपण


भरारी मारली त्यांनी जरासे पंख फुटल्यावर 

उडोनी पाखरे गेली रिकामे पिंजरे आपण


कुणाला संकटामधुनी चला बाहेर काढू या

दिसू दे एकदा त्यांना सुखाचे चेहरे आपण


कशाला बेगडी चिंता दरी निर्माण झाल्यावर

किती रुंदावली आता पिढ्यांची अंतरे आपण


मनाचे पारदर्शीपण जगाला दाखवू आता

तळाचा गाळ उपसू या नितळ व्हावे झरे आपण


सीमा झुंजारराव


 गझलकारा सीमाजी झुंजारराव

 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments