● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹शीव बिचारी उदास एकटी🌹
हा गाव या तटी तो त्या तटी
शीव बिचारी उदास एकटी
काट्यांचा तू काट्यात ये रे
नाही पेलवत फुलांच्या अटी
जीवलग मला शोधत राहिले
सापडलो मीच मला शेवटी
आयुष्या ! हादरल्या पटावर
किती चालवू एकच सोंगटी
शोधतेय ती डाग चंद्राचे
असून पृथ्वी धृवावर चपटी
आश्रितापरी जगलो संचिता
आयुष्याची धरून हनुवटी
बुडतोय धाव विठ्ठला आता
मजा नको बघु ठेवुन कर कटी
रामकृष्ण रोगे
गझलकार रामकृष्णजी रोगे यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments