● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷पराभव अटळ युद्धात माझा🌷
पराभव अटळ आज युद्धात माझा
जवळचाच व्यक्ती करे घात माझा
किती लोक वाईट झाली म्हणावी
दिले बोट तर ओढती हात माझा
विसरलो तिचा चेहरा मी कधीचा
तिला चेहरा मात्र लक्षात माझा
खरे बोलण्याचा जसा यत्न केला
तसा खून केलात चौकात माझा
सवय जात नाहीच वरचढपणाची
जरी मारला मी इगो आत माझा
गिरीष संतोष खोब्रागडे
ब्राम्हणवाडा (पूर्व )
संपर्क : 8263912741
गझलकार गिरीषजी खोब्रागडे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments