Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

ऋतू सरलाच नाही आठवांचा Gazalkar Prashant Vaidya

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷ऋतू सरलाच नाही आठवांचा🌷


केवढा आवाज आहे सांत्वनाचा

हा प्रहर हमखास आहे आसवांचा...!


आपल्या दोघांतही फुलतील बागा 

प्रश्न आहे फक्त एका पावसाचा...!


राजनीतीची किती डबकी सभोती

वाढला संचार आहे बेडकांचा....!


ती... पुन्हा ती... तीच ती स्वप्नात येते 

केवढा लोचटपणा हा भावनांचा....!


लाख गोष्टी ऐकल्या मी पारलौकिक 

अन पदर धरला तुकोबा ज्ञानियाचा...!


भेटसुद्धा आपली होते जशी की

वादळाने वेध घ्यावा वादळाचा...!


यापुढे सावर तुला तू संविधाना 

धाक नाही कायद्यांना कायद्याचा...!


खूपदा आले ऋतू गेले ऋतू पण 

बस ऋतू सरलाच नाही आठवांचा...!


जो तुला अद्यापही जमलाच नाही 

रंग तो देवा बनव की माणसाचा...!


प्रशांत वैद्य



 गझलकार प्रशांतजी वैद्य यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments