● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷कोठे येतो अदमास तुझा🌷
आता कोठे येतो आहे थोडासा अदमास तुझा
कसा करावा किती करावा समजेना अभ्यास तुझा
क्षणाक्षणाला बदलतोस का तुझा राहता पत्ता तू ?
कोठे आहे मना सांग ना कायमचा अधिवास तुझा
झाडाला बिलगून डोलते वाऱ्यावरती वेल जशी
अगदी अगदी तसा असू दे माझ्यावर विश्वास तुझा
नकोस आई करू काळजी मी न एकटा पडलेलो
तू गेल्यावर सोबत आहे होणारा आभास तुझा
मनाप्रमाणे चालत नाही चालणार ना ही दुनिया
कशास करतो.. सोड अनंता वेडा अट्टाहास तुझा
अनंत देशपांडे
गझलकार अनंतजी देशपांडे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments