● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷तुला कळले नसावे🌷
पुन्हा भेटायचे असते तुला कळले नसावे
ह्रुदय जोडायचे असते तुला कळले नसावे
कधी गुंत्यात गुंता होत जातो गाठ पडते
कुठे तोडायचे असते तुला कळले नसावे
जरासा वाद होता का कुणी सोडून जातो
इथे थांबायचे असते तुला कळले नसावे
भल्यासाठी कधी कोणी तुला थोडे हटकले
जरा ऐकायचे असते तुला कळले नसावे
कधी कळले तरी आणायचा मग आव खोटा
तसे समजायचे असते तुला कळले नसावे
चुकीला माफ करणारे इथे ठरतात वेडे
कुणा दुखवायचे असते तुला कळले नसावे
कधी जेव्हा सुखासाठी इथे मिळताच संधी
तिला भोगायचे असते तुला कळले नसावे
जखम ओली कुणालाही कशाला दाखवावी
तिला लपवायचे असते तुला कळले नसावे
नव्याने डाव मांडावा सुनेत्रा हारल्यावर
पुन्हा खेळायचे असते तुला कळले नसावे
सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
गझलकारा सुनेत्राजी जोशी यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments