● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷अशी सुंदर असावी गझल 🌷
अशी फार सुंदर असावी गझल
सुखाचीच फुंकर बनावी गझल
नको घाव ह्रदयी कुणाला कधी
उगा त्रासदायक नसावी गझल
तुला पाहता हर्ष झाला मनी
तुझ्या संगतीने हसावी गझल
प्रबोधन घडावे समाजासही
अशी माणसांना रुचावी गझल
नशा होत जावी तिला ऐकता
सहज भावनांनी कसावी गझल
बुडाले तिच्या पूर्ण प्रेमात मी
जिथे मी पहावे, दिसावी गझल
नव्याने असे जाणले मर्म हे
अशी माय माझी घडावी गझल
सुनीता कांबळे
गझलकारा सुनीताजी कांबळे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments