● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷माझ्याच भावनांचा आहे लिलाव🌷
माझ्याच भावनांचा आहे लिलाव आता
लावावयास बोली जमलाय गाव आता
होते सदैव ज्यांना धरले जरी उराशी
त्यांनीच या उरावर केलेत घाव आता
चोरी करून ज्यांची सारी हयात गेली
फिरतात तेच येथे होऊन साव आता
संतावरीच आहे माझी अपार प्रीती
त्यांचाच जीवनावर दिसतो प्रभाव आता
सत्यास झाकणे हे सूर्यास झाकण्यासम
सूर्यास झाकण्याचा दिसतो बनाव आता
श्री जयराम महादू कराळे
मु. मानिवली, ता. मुरबाड
मो. 9221627481
गझलकार जयरामजी कराळे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments