● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷जगास साऱ्या हसवत गेले🌷
तुझ्या प्रितीचे मुके खुलासे कळले नाही,
मनात होते तसे कधीही घडले नाही.
हसू देउनी जगास साऱ्या हसवत गेले,
पुढ्यात होते दुःख तरीही रडले नाही.
मुक्त सोडले खुळ्या मनाचे अवखळ घोडे,
लगाम घालू कधी मनाला ठरले नाही.
किती बहरली फुले नव्याने बागेमधली,
मला हवे ते माझ्या हाती उरले नाही.
धडा कळेना कधी कुणाला बघ काळाचा,
नशीब फसवे कधी कुणाला टळले नाही.
तुला मिळाले ऋतू गुलाबी या प्रेमाचे,
वैशाखाचे छळणे माझे सरले नाही.
तरून गेल्या किती विटा त्या काठावरच्या,
इथे लव्हाळे, नदी, किनारे तरले नाही.
सौं. अनुराधा वायकोस
गझलकारा अनुराधाजी वायकोस यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments