Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मी कुशल माहूत आहे Gazalkara Sunanda Bhavsar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷मी कुशल माहूत आहे 🌷


निश्चयाच्या अंकुशाने ठेवला काबूत आहे

जीवना तू मत्त हत्ती मी कुशल माहूत आहे


का तुझाही हट्ट इतका की भविष्यालाच पाहू

वर्तमानाला पहा ना जो उद्याचा भूत आहे


तू शहाण्यांच्याप्रमाणे आजही पण हे पहा की

जायचे ते दूर गेले जे अता शाबूत आहे


वादळे भूकंप दुष्काळामुळे हैराण आम्ही

बांधतो आम्ही घराचे स्वप्न जे वाळूत आहे


लाख इच्छांचाच माझ्या मी खुषीने उंट केला

मी स्वतःबाहेर माझ्या उंट तो तंबूत आहे


काळ येतोही बिकट पण तो कुठे थांबून असतो

कवळलेले दुःख कायम का बरे बाहूत आहे


सौख्य आणिक दुःखसुद्धा तू सुनंदा घेत जा ना

जीवनाचे सत्य दर्शन दोनही बाजूत आहे


सौ. सुनंदा सुहास भावसार

नंदुरबार



 गझलकारा सुनंदाजी भावसार यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments