● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷हवे आहे🌷
उमलणाऱ्या कळ्यांसाठी इथे कुंपण हवे आहे..
मनाच्या पारिजाताला तुझे अंगण हवे आहे..
कितीदा टाळते उत्तर गुलाबी एक प्रश्नाचे..
जगाला ह्या नकाराचे खरे कारण हवे आहे..
झळा सोसून गेलेल्या तुझ्या माझ्या वसंताला
सुखाची सर बरसणारे नवे श्रावण हवे आहे..
विटांच्या बांधल्या भिंती म्हणू घर लागलो त्याला
जिव्हाळा प्रेम जपणारे तिथे घरपण हवे आहे..
उधळला रंग सांजेने.. उजळली ज्योत तिमिराची
निशाला आज ताऱ्यांचे जणू औक्षण हवे आहे
असावे फक्त आईच्या हसू कायम मुखावरती
तिला निर्व्याज प्रेमाचे कुठे तारण हवे आहे ?
मराठीच्या दुधावरची न येई साय वाट्याला
कशाला अन्य भाषेतुन इथे शिक्षण हवे आहे?
तुला जर वाटते अपुली टिकावी संस्कृती,भाषा..
शिवाजीच्या विचारांचे घरी तोरण हवे आहे..
ऋषभ कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर
गझलकार ऋषभजी कुलकर्णी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments