● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷कांचनमृग 🌷
कांचनमृग हा हवा वाटतो, म्हणे जानकी चोळीसाठी
जन्मच अवघा पणास लागे, मुखातल्या या ओळीसाठी
नसे भाकरी टोपलीत अन भाजीचा तर पत्ता नव्हता
मूल उपाशी आडमुठे हे अडून बसले पोळीसाठी
रोजरोजच्या पक्वान्नांनी जीभ शेवटी विटून गेली
रुसून बसली मासोळीच्या चमचमीत गाभोळीसाठी
गाव राहिले फार दूरवर डोईवर सामान जरासे
एक फाटके लुगडे त्यातच सोनुकल्याच्या झोळीसाठी
चिंता आजी आजोबांना, नुरला काढा सरल्या गोळ्या
मात्र काळजी त्यास वाटते रडे लेकरू गोळीसाठी
ऊन तापले डोईवरचे पाय भाजणारे अनवाणी
चार लाकडे गोळा करते माय आपल्या मोळीसाठी
पत्रही नसे फोन मिळेना लेक सासरी काय करावे
पोरीची सामग्री केली सासरच्यांनी होळीसाठी
उर्मिला बांदिवडेकर
गझलकारा उर्मिलामाई बांदिवडेकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments