Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

या देहाचे आम्ही झालो चाकर Gazalkara Meenakshi Gorantiwar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷या देहाचे आम्ही झालो चाकर 🌷


सोबत नेता येते का हो कणभर

 उगाच आपण जमवत बसतो ढिगभर


 तुडुंब येथे हा ज्ञानाचा सागर 

भरून घेऊ ओंजळ ओंजळ घागर 


ऋतू हिवाळा धुंद गुलाबी थंडी 

दे ! ना राणी ओठांमधली साखर


आयुष्य कसे पाचोळ्यागत झाले 

वाऱ्यासंगे फिरते आहे गरगर


कशास जाऊ काशीला मी सांगा !

आईचरणी मला भेटतो ईश्वर 


हृदयामध्ये व्यथा डांंबल्या अगणित 

 धारण केला हसरा मुखडा वरवर


घडणावळ ही खासच केली देवा

या देहाचे आम्ही झालो चाकर


जाणारा तर निघून जातो पटकन 

आठवणींना ठेउन जातो घरभर


 ओढ घराची कुणास चुकली आहे 

फिरुनी येतो माणूस जरी जगभर 


मीनाक्षी गोरंटीवार



 गझलकारा मीनाक्षीजी गोरंटीवार यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments