● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷होकार ओठांचा🌷
कशाला मांडते आहेस हा बाजार ओठांचा..
कधीकाळी लळा होता तुलाही फार ओठांचा
तुझ्या नाजूक ओठांना कशाला फासते लाली
उडाला रंग आहे का खरा रसदार ओठांचा..
खुल्या जागेवरी मित्रा नको हे..भान राहू दे..
कसे हे चालले चाळे किती व्यापार ओठांचा
तिची दहशत किती सांगा कुणी जाऊन थंडीला
हवासा स्पर्शही असतो तुझ्या उबदार ओठांचा
तुझ्या व्याकूळ नजरेने दिलेला कौल आहे पण
मलाही वाटते आहे मिळो होकार ओठांचा
गौतम राऊत
गझलकार गौतमजी राऊत यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments