Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

माझा लळा असावा Gazalkar Vaishali Mali

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹


🌷माझा लळा असावा🌷


इथे एवढा कुणास माझा लळा असावा

प्रवास माझा कुणामुळे देखणा असावा


कैक सुखांनी ओटी भरलेली जन्माने

नशिबा बहुदा पदर तुझा फाटका असावा


कुठल्या कुठल्या नात्यांवरती बोलत बसतो 

असे वाटते आतुन तो एकटा असावा


तुला कधी जर भेट द्यायचा ठरवलाच मी

सांग मला तो दिवस नेमका कसा असावा


पुन्हा मनाचे झाड कशाने बहरत आहे

मेंदूमध्ये नक्की कुठला थवा असावा


हाक मारली आहे त्याने ज्या प्रेमाने

पुन्हा एकदा चहा वगैरे हवा असावा


तुझ्यासारखा बिलकुल सुद्धा वाटत नाही

खरा चेहरा तुझा फार वेगळा असावा


वैशाली माळी



 गझलकारा वैशालीजी माळी यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.. 

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments