Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आहे कुठे Gazalkar Pramod Kharade

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷आहे कुठे? 🌷


आतला आवाज ऐकावा असा आहे कुठे?

ओरडायाला मला माझा घसा आहे कुठे? 


शोधण्यासाठी मला मी हिंडतो आहे जरी

सापडायाला जसा होतो तसा आहे कुठे?


हुंदक्यांचा काळ गेला मोठमोठ्याने रडा

ऐकण्यासाठी जुना तो वारसा आहे कुठे?


मी नव्याने भांडण्यासाठी उभा आहे तरी

तो जुना उत्साह माझा फारसा आहे कुठे?


मी तसा माझ्यातला ' मी ' काढला खेचूनही

वाटते की वाढणारा कोंबसा आहे कुठे..


प्रमोद खराडे

पुणे


 गझलकार प्रमोदजी खराडे यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments