● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷कोजागिरी🌷
चांदण्यानी आज फुलली सावळी कोजागरी
शुभ्र तारे तारकांची वेगळी कोजागरी
लख्ख पडले चांदणे उजळीत ह्या दाही दिशा
दान सौख्याचे उधळते आगळी कोजागिरी
दूध साखर धन्य झाले पाहिल्यावर चंद्रमुख
गोडवा उतरून रुजलेली कळी कोजागिरी
चांदण्यांचे घुंगरू पायात झनझन घालुनी
पैंजणाचा नाद घुमवित हासली कोजागिरी
पौर्णिमेला कोण जागे पाहते लक्ष्मी इथे
देत फिरते ती सुखाच्या ओंजळी कोजागिरी
सौ. मानसी मोहन जोशी
गझलकारा मानसीजी जोशी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments