● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷तिला पाहिले की बरे वाटते हो🌷
कुणा काय वाटो कुणी काय बोलो
मला स्वप्न माझे खरे वाटते हो,
बघा ना अताशा असे काय होते?
तिला पाहिले की बरे वाटते हो ....!
नसे उर्वशी की नसे मेनका ही
नसे हूर अथवा नसे देवता ही,
असे फक्त साधी, असे खूप भोळी
तरी रूप ते साजरे वाटते हो ....!
जरा आड नजरेस जाता कुठे ती
तिला शोधतो मी इथे सारख्यांदा,
असे शोधतांना जसा काळ जातो
मला घाबरे घाबरे वाटते हो ....!
कसा आवरू मीच माझ्या मनाला ?
कशी आज सांगू मनाची अवस्था ?
कधी दूर व्हावी मनाची भिती ही ?
मला कावरे वावरे वाटते हो ....!
जुन्या रीतभातीस सांभाळते ती
नको सर्व ते ते इथे टाळते ती
मला आदराने अहो बोलते हो
खरे सांगतो ते 'अरे' वाटते हो ....!
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
गझलकार दिवाकरजी चौकेकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments