● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷पिंजऱ्याचा निवारा नको🌷
तुझे प्रेम नसले तरी चालते पण तुझा जीवघेणा दरारा नको
जरी गारवा पायवाटेत नाही मला पोळणारा निखारा नको
जरी वाहणे हा तिचा धर्म आहे सदा मुक्ततेने तिला वाहु दे
वृथा बंधने मग तिला घालणारा उगा रोखणारा किनारा नको
प्रवासात नाही तुझी साथ आता दिशा लाभते मग तसे जायचे
सतावू नको तू विचारात येवुन जुन्या आठवांचा शिकारा नको
दिखाव्यात नाही पुराव्यात नाही तुझे प्रेम हृदयात मी पाहते
अपेक्षाच नाही तुला भेटण्याची खुळ्या भावनांचा पसारा नको
मिळालाच नाही इथे बंगला तर स्वकष्टातली झोपडीही बरी
अढळपद असे नंदिनीला मिळावे उगा पिंजऱ्याचा निवारा नको
नंदिनी काळे
गझलकारा नंदिनीजी काळे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments