Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

जपलाय अजुनी प्रेमवेडा मोगरा Gazalkar Abhijit Kale

    ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷 जपलाय अजुनी प्रेमवेडा मोगरा 🌷


कोणता खोटा म्हणू मी कोणता आहे खरा?

एक आहे आरसा अन् एक माझा चेहरा!


वाटल्या वाटा तिने अन् वेगळी झाली कथा 

संथ माझ्या जीवनाचा होत गेला भोवरा


काय तू केलेस त्याचे.. मी हृदय होते दिले

दाखवू त्याला नको गं तू निबिडसा  कोपरा


शुभ्र त्या हसऱ्या फुलांचे तू दिलेले वाण जे

तोच मी जपलाय अजुनी प्रेमवेडा मोगरा


हे कसे कळले तिला की दुःख मजला पावले

आसवे डोळ्यांत आली शब्द झाला घोगरा


पाहिल्या सोळा कला अन् पौर्णिमाही पाहिली

चांदणी शोधीत आली चंद्र माझा हासरा


हिंडलो वस्त्या हजारो लाभला ना आसरा

जन्म हाही व्यर्थ गेला.. रान चुकल्या कोकरा 


राख व्हावी एवढा साधासुधा नव्हताच  'मन'

भस्म झालो मी ललाटीचे तुझ्या मग ईश्वरा


अभिजीत काळे


 गझलकार अभिजीतजी काळे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments