Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आयुष्याला शब्दांनी आधार मिळाले Gazalkar Maroti Arewar

   ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹




 🌷आयुष्याला शब्दांनी आधार मिळाले 🌷


आयुष्याला शब्दांनी आधार मिळाले 

मनासारखे मित्र खरे दिलदार मिळाले 


नकोच आता याहुन मजला अजुन काही 

सखे, सोयरे आनंदी दरबार मिळाले 


विस्कटलेल्या इच्छा घेउन प्रवास होता 

आज अचानक वाटेला आकार मिळाले 


 विण नात्याची विणली आहे विश्वासाने 

जसे पाहिजे तसे मला घरदार मिळाले 


वाटेवरच्या संघर्षानी झालो काटक 

मला हरवण्या दुःखेही कसदार मिळाले 


अनुभवांनी सजले आहे जीवन माझे 

क्षण सोनेरी, आठवणी भरदार मिळाले 


कमावलेले, गमावलेले मोजत बसलो 

जगात केवळ स्वार्थाचे बाजार मिळाले


मारुती आरेवार


 गझलकार मारोतीजी आरेवार यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments